केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अभिनेत्री काजोल यांची उपस्थिती
नागपूर, ता.१२ डिसेंबर २०२४: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे ९ व्या पर्वाला शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी प्रारंभ होत आहे. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण या कलागुणांचा संगम असलेल्या महोत्सवाचे प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते सायंकाळी ६
वाजता उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी राहतील. खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सर्व आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, समीर मेघे, आशीष देशमुख, चरणसिंग ठाकूर, भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्यासह आयोजन समिती सदस्य व इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
२३ डिसेंबरपर्यंत चालणा-या या महोत्सवात सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात होणा-या या महोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी नागपूरकरांना मिळणार असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबतच स्थानिक कलाकारदेखील या मंचावर आपली कला सादर करतील.
संस्कार भारतीचा ‘मैं हूं भारत !’
महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर लगेच संस्कार भारती, नागपूर प्रस्तुत ‘मैं हूं भारत’ हा भारतीय इतिहासाची गाथा विशद करणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बाराशे कलावंतांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक गजानन रानडे,अमर कुळकर्णी व आनंद मास्टे आहेत. दीपाली घोंगे, मंगेश बावसे, सारंग मास्टे, अभिषेक बेल्लारवर हे नाट्य तर अवंती काटे, कुणाल आनंदम् नृत्य विभागाचे संयोजन करीत असून नेपथ्य सुनील हमदापुरे यांचे आहे. शंतनु हरिदास, प्रसाद पोफळी, नीरज अडबे, आसावरी गोसावी, श्रीकांत बंगाले, अभिजीत बोरीकर, संजय खनगई, अक्षय वाघ, प्रदीप मारोटकर, मनोज श्रोती कार्यक्रम समन्वयक आहेत.
वेदकाळापासून आज पर्यंतचा भारताचा प्रदीर्घ इतिहास भक्तिगीते, देशभक्तीची नवी गीते, शास्त्रीय व लोकनृत्य अशा विविध कलाप्रकारांतून उलगडला जाईल, असे संस्कार भारतीचे नागपूर महानगर अध्यक्ष वीरेंद्र चांडक, कार्याध्यक्ष डॉ. मृणालिनी दस्तुरे आणि शहर मंत्री मुकुल मुळे यांनी कळवले आहे
कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून नागरिकांनी अर्धा तास आधी कार्यक्रम स्थळी येऊन आपले स्थान ग्रहण करावे, असे आवाहन खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांनी केले आहे.
येथे मिळवा पासेस
जाहिराती, होर्डिंग्ज इत्यादी प्रसिद्धी साधनांवर असलेला ‘क्युआर कोड’ स्कॅन करून त्या-त्या दिवसाची मोफत पास प्राप्त करता येतील. याशिवाय. ईश्वर देशमख
शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीडा चौक येथे सकाळी ८ ते पासेस संपेपर्यंत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय, खामला येथून देखील सकाळी ११ ते दुपारी २ यावेळात पासेस प्राप्त करता येतील.
पार्किंग व्यवस्था ‘क्यूआर कोड’ वर
यावेळी पार्किंग व्यवस्था व प्रसाधनगृह व्यवस्थेसाठीदेखील क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. पासेसच्या मागे असलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर मोबाईलवर पार्किंग व प्रसाधनगृहाचा रूट मॅट प्रदर्शित होईल आणि विनाप्रयास दर्शकांना या सुविधांचा वापर करता येईल.
KHASDAR SANSKRUTIK MOHOTSAV 2024
Programme Schedule-
13h Dec. To 22nd December 2024
S.N. Date Programme
1] 13th December, 2024 Inaugural
Function- Noted Bollywood Actress – Kajol Sanskar Bharti Presents – ‘Mai Bharat Hu…!!
भारताची सांस्कृतिक व लोक धारा दर्शविणारा नाट्य, नृत्य व संगीतमय आविष्कार2] 14th December, 2024
‘APNE APNE RAM’ – Dr Kumar Vishvas
3]15th December, 2024
4]16th December, 2024
39
5] 17th December, 2024 अभंग वारी – आषाडी वारीचे दर्शन घडविणारा २००० वारकरी कलाकारांचा नाट्य, नृत्य व संगीतमय अविष्कार
6] 18th December, 2024 ‘अभिजात मराठी’ – महाराष्ट्राचा आवाज असलेल्या मायमराठीला मानाचा मुजरा………
7] 19th December, 2024 Live In Concert – ‘Instrumental Fusion’ (South & North)
8] 20th December, 2024 Live in Concert Sanam Band
9] 21st December, 2024 Live in Concert – Udit Narayan
10] 22nd December, 2024 Live in Concert Vishal Mishra
11] 23rd December, 2024 Live in Concert – Jubin Noutiyal
Programme Schedule Morning 7 to 8.30
1 14th December, 2024 श्री हनुमान चालीसा
2 15th December, 2024 श्रीरामरक्षा स्तोत्र श्री मारुती स्तोत्र सामुहिक पठण
2 16th December, 2024 श्री रुद्र पठण
3 17th December, 2024 श्री हरिपाठ पठण
4 18th December, 2024 श्री गणपती अथर्वशीर्ष पठण
5 19th December, 2024 श्री गजानन विजय ग्रंथाच्या २१ व्या अध्यायाचे पारायण पठण सोहळा
6 20th December, 2024 मनाचे श्लोक, ‘वंदेमातरम् ‘ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अंदाजे 25000 विद्यार्थ्यांचे वंदेमातरम् गायन
7 21st December, 2024 श्री सुंदरकांड पठण
8 22nd December, 2024 श्रीसुक्त पठण