क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे आदर्श घेऊन आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजे.
प्रगती अजय पाटील
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
नागपूर :
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी,भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नागपूर शहर महिला मोर्चा सौ प्रगती ताई पाटील यांच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली. सावित्रीबाईंनी समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ स्त्री शिक्षणाचा पुढाकार, सक्षमीकरण,सामाजिक अन्यायाला आव्हान देण्यासाठी आणि समतेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांनी भारतीय इतिहासावर अमिट छाप सोडली आहे. सत्यशोधक समाज ची स्थापना केली.सामाजिक अन्याय, जातिव्यवस्था आणि महिला अत्याचाराविरुद्ध लढा दिला. त्यांच्या या अनेक बलिदानामुळे आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात स्त्रीचे महत्व निदर्शनात आणून दिले आहे. आज काळाची गरज असून प्रत्येक स्त्रीने सावित्रीबाईंचे आदर्श घेऊन आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजे,असे आवाहन प्रगती ताई यांनी केले.
या कार्यक्रमाला सावित्री बाई च्या लेकी
माजी महापौर अर्चना डेहनकर, श्रद्धा पाठक,माजी नगरसेविका उज्वला शर्मा,निकिता पराये, ज्योत्स्ना कुऱ्हेकर कविता इंगळे,कविता,सुनीता पाटील, सरदार,कल्पनाताई पझारे, संगीताताई पाटील सुनीता दाभाडे,रोशनी सोनी,कल्पना शर्मा, तारा भाकरे, पुष्पा सारंगपूरिया, डॉ.मीनाक्षी मते, प्रीती यादव,उषा बेले, डॉ. मधू सोनी, विभा पांडे, रुपल दोडके उपस्थित होत्या.