आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराच्या आयोजनाद्वारे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
नागपूर: एडुसन फाउंडेशन, श्री गजानन बहुउद्देशीय शिक्षण संस्था व रीइनफोर्स कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी, राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद जयंतनिमित्त विनामूल्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व रक्त तपासणीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोसले यांनी केले. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून श्री गजानन शाळेचे मुख्यधापक कमलाकर तंबाखे, सोशल वर्क महाविद्यालयाचे प्राध्यापक निशांत माटे व रीइनफोर्स कन्स्ट्रक्शन चे संचालक अनिकेत खिरकेकर उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोसले यांनी राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य अरोग्यशिबिराचे उत्तम आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अश्याप्रकरचे आयोजन सतत व्हावे असा विचारही व्यक्त केला. निशांत माटे यांनी युवा अवस्थेमध्ये रक्तदानाचे महत्त्व विषद केले. एडुसन फाऊंडेशन चे संचालक निलेश काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व या रक्तदान शिबिराचा उद्देश हा गरीब, सिकेलसेल, थ्यालेसिमिया, व कर्करोग रुग्णांना मदत होणे असे नमूद केले. शिबिरामध्ये १०० च्या वर नागरिकांनी सहभाग घेतला. ३५ नागरिकांनी रक्तदान केले व ४२ नागरिकांनी मोफत रक्त तपासणीचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन एडुसनचे सहसंचालक सरोज काळे यांनी केले.
👆🏾