मौजा- वाकडी (म्हसली) संगित:- शेवटची आंघोळ या नाटकाचा उद्घाटन सोहळा मा.खा.अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते पार पडला
वाकडी( म्हसली) ता.जि.गडचिरोली दिं..२४ जानेवारी २०२५
मौजा वाकडी (म्हसली) येथे संगीत:- “शेवटची आंघोळ” या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नाटकाचे उद्घाटन भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थिती पार पडला त्यांनी उपस्थिती रसिक प्रेक्षकांना नाटकाचा आस्वाद घेत या माध्यमातून उद्बोधनाचा चांगला लाभ घेण्याचे आवाहन केले. अशा नाटकाच्या आयोजित उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची आणि एकत्र येण्याची संधी मिळते, असे उद्घाटन पर विचार मांडले.
या सोहळ्यात मंचावर जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, ता.महामंत्री बंडूभाऊ झाडे,भाजपाचे युवा नेते बंट्टी भाऊ खडसे,पत्रकार रुपराज भाऊ वाकोडे,जेष्ठ नेते बोरकुटे पाटील, पुष्पाताई पिलारे,यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
