गडचिरोलीत महादेवराव पिंपळशेंडे यांच्या मुलाच्या विवाह सोहळा प्रसंगी – माजी खासदार अशोकजी नेते यांची परिवारासह उपस्थिती
दिं.२७ नोव्हेंबर २०२४
गडचिरोलीतील ज्येष्ठ नेते मान. श्री. महादेवराव पिंपळशेंडे यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री अशोकजी नेते यांच्यासह पत्नी सौ.अर्चनाताई अशोक नेते यांनी उपस्थित राहून नव वधू-वरांना सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभाशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या.
हा भव्य विवाह सोहळा गडचिरोलीतील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे संपन्न झाला.
या विवाह कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. प्रणयभाऊ खुणे,मनोहर पा.पोरेट्टी,विश्वजीत कोवासे,विश्वहिंदु परिषदेचे पदाधिकारी रामायणजी खटी, वनविभागाचे से.निवृत्त अधिकारी शालिकराम विधाते, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेशजी अधिकारी, श्री. सचिन पिंपळशेंडे,यांसह अनेक नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.