खसाळा/नागपूर 1 जानेवारी 2025 नागपुर शहर पोलीस अंतर्गत येणाऱ्या कपिलनगर पो. स्टे. हद्दीतील खसाळा वार्ड क्रमांक. 1 मधील रहिवासी लीलाधर डाखोळे वय (48 वर्षे) आणि त्यांची पत्नी अरुणा डाखोळे (45वर्ष) यांची हत्या झाल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडुन मिळाली आहे.
त्यांच्या 21 वर्षीय मुलाने उत्कर्ष लिलाधर डाखोळे याने 26 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता आईचा गळा दाबून तर 3.30 वाजता वडील लिलाधर डाखोळे यांना चाकूने वार घालत ठार केले होते!
उत्कर्ष अभियांत्रिकी शाखेत अनुत्तीर्ण होत होता त्यामुळे, संगीता उच्च प्राथमिक शाळा, विनोबा भावे नगर येथे शिक्षका असलेल्या आईने व कोराडी थर्मल पावर येथे नोकरीवर असणारे वडील यांनी उत्कर्ष याला अभियांत्रिकी सोडून शेती करण्याकरिता त्यांच्या नातेवाईकांच्या घरी बैलवाडा, बोखारा, गोधनी येथे निघून जाण्यासाठी बाध्य केले होते. उत्कर्ष हा यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे तिस-या वर्षात शिकत असून, तो पहिल्या वर्षाच्या भौतिकशास्त्र विषयात अनुत्तीर्ण झाल्याने तिस-या वर्षाची परिक्षा देऊ शकला नाही. त्यामुळे त्याचे आईवडील त्याला सतत टोमणे मारत होते, व त्याला शेती करण्या करीता नातेवाईकाकडे जाण्यास सांगत होते.
26 डिसेंबर रोजी उत्कर्ष याची लहान बहीण महाविद्यालयात गेली होती व वडील कोणाच्या तरी अंत्यविधीला गेले होते. उत्कर्ष हा दुपारी दीड वाजता त्याच्या बेडरुम मध्ये होता, त्याची आई त्याच्या बेडरुममध्ये आली असता त्याने आईच्या गळ्यात हात टाकून गळा दाबला, यात तिचा मृत्यू झाला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आईने त्याच्या बेडरुममध्ये येऊन, तुझी बॅग भरली आहे तुला नातेवाईकाकडे शेती करायला जावेच लागेल, अशी सूचना केली होती! दुपारी साढे तीन वाजता वडील घरी आले असता वडीलांचाही उत्कर्षने गळा दाबण्याचा प्रयत्न केला मात्र, वडीलांनी तीव्र प्रतिकार केला परिणामी, उत्कर्षने चाकूचे वार त्यांच्या खांद्यावर, मानेवर केल्याने, ते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. उत्कर्षने रक्त पुसून घराला कुलुप लावले, वडीलांचा मोबाईल घेऊन व गाडी घेऊन निघून गेला.
सायंकाळी 5 वाजता बहीणीला फोन करुन ऑटोमोटीव्ह चौकात बोलावले व आई-वडील मेडीटेशनला बंगलोरला गेले असल्याचे सांगून तिच्या सोबत बैलवाडा, बोखारा येथे निघून गेला. घटना उघडकीस येईपर्यंत दोघेही भांवडे नातेवाईकांच्याच घरी होती.
मातापित्याची निघृण हत्या केली. जन्मदात्या मातापित्याने नवीन वर्षाची पहाट बघितलीच नाही. आरोपी उत्कर्ष लीलाधार डाखोळे ने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती PI महेश आंधळे यांनी VANSH NEWS शी बोलतांना सांगितले. सध्या उत्कर्ष हा कपिल नगर पोलीसांच्या ताब्यात असुन खसाळा येथील घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी प्रेतांचा पंचनामा करीत दोन्ही मृतदेह पोस्टमार्टम साठी मेयो रुग्णालयात दाखल केले.
दि. 26 डिसेंबर 2024 ला या दोघांची हत्या झाल्याची माहिती पुढे येत आहे. खसाळा हे गाव महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जन्मगाव आहे. येथील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच हा प्रकार उघडकीस आला असल्याचे ही समजते. वरिष्ठ पोलीस अधिकारी कपिलनगर पो. स्टे. येथे पोहोचले असुन खसाळा रहिवासी आजच पोस्टमार्टम करुन डाखोळे दंपतीचे प्रेत गावात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.
