महाराष्ट्र वनरक्षक व पदो. वनपाल संघटनेच्या नागपूर वनवृत्त अध्यक्षपदी श्री. आनंद तिडके यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर या संघटनेची आज दिनांक 12/01/2025 रोजी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. श्री. अजयभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली. राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती असल्यामुळे दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून आम सभेची सुरुवात करण्यात आली. आमसभेत नागपूर वनवृत्ताचे अध्यक्ष तसेच नागपूर वनविभागाचे अध्यक्ष पदाकरिता निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली. सदर निवड प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडणेकरिता निरीक्षक म्हणून संघटनेचे नाशिक वनवृत्ताचे अध्यक्ष श्री. पंकज देवरे हे उपस्थित होते. सदर आमसभेत नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा या चारही जिल्ह्यातील महिला व पुरुष वनरक्षक तसेच वनपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी मिळून एकमताने वनपाल श्री. आनंद तिडके यांची नागपूर वनवृत्ताचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच वनरक्षक कु. ललिता वरघट यांची संघटनेच्या नागपूर विभागाचे अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त वृत्त अध्यक्ष श्री. आनंद तिडके वनपाल यांनी यापूर्वी संघटनेचे वृत्त सचिव म्हणून काम केलेले आहे. सचिव असतांना त्यांनी वनकर्मचारी यांच्या समस्यांचे निराकरण करणेकरिता डॉ. श्री. अजयभाऊ पाटील यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात उत्तम रित्या काम केल्यामुळे उपस्थित सर्व वनरक्षक व वनपाल यांनी त्यांची वृत्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कु. ललिता वरघट यांनी सुद्धा यापुर्वी संघटने मध्ये उत्कृष्टरित्या काम केलेले आहे. विशेषतः महिलांच्या विविध अडी-अडचणी सोडविणेकरिता त्यांनी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांची सुद्धा नागपूर विभागीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. प्रसंगी सर्व उपस्थितांना केंद्रीय अध्यक्ष डॉ. श्री. अजयभाऊ पाटील व कार्याध्यक्ष श्री. माधव मानमोडे यांनी मार्गदर्शन किले. श्री. तिडके वनपाल व कु. वरघट वनरक्षक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संघटनेचे तत्कालीन वृत्त अध्यक्ष श्री. सतिश गडलिंगे, तत्कालीन विभागीय अध्यक्ष श्री. कैलास सानप, तसेच श्री. अनिल खडोतकर, कु. रेखा राठोड, श्री. संजय परेकर, श्री. अनिल जंगले, श्री. सयाम, श्री. दिपक कडू, श्री. कल्याणकस्तुरे, श्री. प्रकाश कोकणे, श्री. ज्ञानेश्वर चौधरी, तसेच उपस्थित सर्व पुरुष तसेच महिला वनरक्षक व वनपाल यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. ममता भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. कन्हैया नागपुरे यांनी केले.