*_मा.खा.अशोकजी नेते यांची सांत्वना भेट:_*
*_स्व.गोपीकृष्ण कलंत्री यांच्या निधनाने व्यापारी वर्गात शोककळा_*
दि.२६ नोव्हेंबर २०२४
गडचिरोली शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व गौभक्त स्व. श्री. गोपीकृष्ण कलंत्री यांचे काल रात्री अचानक दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांनी श्री. कलंत्री यांच्या जाण्याने व्यापारी वर्ग आणि समाजकार्यात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
या सांत्वना भेटीत जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे ही उपस्थित होते.