नागपूर, 27 डिसेंबर 2024 पत्रकार धनंजय तरारे
भाजप युवा मोर्चा (भाजयुमो) नागपूर महानगराच्या शिष्टमंडळाने आज नागपूर पोलीस आयुक्त श्री. रवींद्रजी सिंगल यांची भेट घेतली आणि शहरात नायलॉन मांजाच्या विक्रीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी निवेदन सादर केले.
नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या जीवाला आणि पक्ष्यांना गंभीर धोका निर्माण होतो. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून शहरात अशा प्रकारच्या अवैध विक्रीवर तत्काळ बंदी घालणे अत्यावश्यक आहे. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आपली तीव्र भावना व्यक्त करत, विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
या वेळी शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागपूर पोलिसांनी या समस्येवर त्वरीत तोडगा काढण्यासाठी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
या भेटीत भाजयुमो महानगर अध्यक्ष बादल राऊत यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले व प्रदेश सचिव श्रेयस कुंभारे नागपूर महानगर महामंत्री आशिष मोहिते, सागर घाटोळे, उपाध्यक्ष राहुल अल्लरवार प्रसिद्धी प्रमुख मनमीत पिल्लारे, युवती प्रमुख डिंपी बजाज , राहुल वाटकर, स्वप्नील फुलसुंगे अमन पारधी अक्षून खापरे प्रामुख्याने उपस्थित होते