सुदृढ आरोग्य ही चांगल्या शरीराची किल्ली – मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे
रामटेक – रक्तदानामुळे गरजवंताना वेळेवर रक्त उपलब्ध होते. त्यामुळे रक्तदान ही चळवळ म्हणून उभी करावी तसेच सुदृढ आरोग्य ही चांगल्या आरोग्याची किल्ली असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी केले. प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन (मनसर) येथे आयोजित आज (ता ११) रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरात बोलत होते.
ग्रामहित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्व बळीरामजी दखने यांच्या 21 व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिन, जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष स्व श्री बळीरामजी दखने यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त तसेच माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आज (ता ११) भव्य रक्तदान, आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खाण प्रबंधक श्री मनोज मोंढे, खाण प्रबंधक श्री समीर महानतारे, ओरिंयटल टोल प्लाजा श्री अतुल आदमने, सरपंच ममता बन्सोड, उपसरपंच श्री राजा कठौते, लाइव्ह संरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष श्री ए. टी खोब्रागडे, मनसर पोलीस उपनिरीक्षक श्री पाटणकर, पारशिवनी उपनिरीक्षक सौ पाटणकर, टू नर्सिग काॅलेजचे व्यवस्थापक श्री ओमप्रकाश ढोले, चक्रधर स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक संगीता धोटे, पंचायत समिती सदस्य रिता कठौते, केंद्रप्रमुख श्री प्रकाश महल्ले, वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक श्री अरुण बकाल, मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते.
कांद्री-माईन मनसर गावातील ८० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी २१ व्यक्तींनी रक्तदान केले. लाईव्ह अर्थ संरक्षण सेवा ट्रस्ट तर्फे गरजवंत नागरिकांना बॅलकेटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. कामिनी पाटील यांनी तर आभार सौ सुचिता नागपूरे मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री श्याम गासमवार,श्री विजय लांडे ,श्री अशोक नाटकर, श्री प्रशांत सरपाते ,सौ.अनिता खंडाईत, कु. ज्योत्सना मेश्राम, श्री बसंत ठकराले, श्री प्रभाकर खंडाते, श्री मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग, मनसर, रामटेक, पारशिवनी व कन्हान येथील पत्रकार संघ, बिरसा मुंडा फुटबॉल क्लब कांद्री, लाईव्ह अर्थ संरक्षण सेवा ट्रस्ट नागपूर, यांचे सहकार्य लाभले.