मौजा-व्याहाड बुज.येथे माऊली मातेच्या चावळी बांधकामाचे भूमिपूजन व सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी विचार घ्यावे. मा.खा.अशोकजी नेते यांचे प्रतिपादन
_मा.खा.अशोकजी नेते यांचे शुभहस्ते कुदळ मारून चावळी बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
दि. ३ जानेवारी २०२५
आनंद मेश्राम
सावली:-तालुक्यातील मौजा व्याहाड बुज येथे मा. खा. अशोकजी नेते यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर पाच लाख रुपयांच्या निधीतून माऊली मातेच्या चावळी बांधकामाचे भूमिपूजन मा.खा.अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते माऊलीचे विधिवत पुजन करत कुदळ मारून मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य लाभले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मा. खा. अशोकजी नेते म्हणाले,
> “व्याहाड बुज हे सावली तालुक्यातील मोठे गाव असून, येथे माझ्या प्रयत्नाने एकोरी मातेचे सभागृह,एकोरी मातेचे सौंदर्यीकरण, विश्वकर्मा सभागृह, रस्ते व नाल्यांचे अनेक बांधकाम, बांधकाम सौंदर्यीकरण यासह एक कोटी रुपयां पर्यतची अनेक विकासकामे झाली आहेत. या कामांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा, आणि गावाच्या पुढील अडीअडचणी मला सांगाव्यात. मी या गावाच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहील. नववर्ष व सावित्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!”
सावित्रीबाई फुले यांचे विचार:
सावित्रीबाईंच्या कार्याला अधोरेखित करत नेते म्हणाले की,
> “स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या सावित्रीबाईंनी सामाजिक परिवर्तनाचा पाया घातला. त्यांच्या विचारांवर चालून महिलांना स्वावलंबी व सशक्त बनवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.”
पुढे बोलतांना मा.खा. अशोकजी नेते म्हणाले मी विकासासाठी कटिबद्ध असुन “लोकसभेच्या निवडणुकीत माझा पराजय झाला असला तरी आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या गावाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. अनेक प्रलंबित व मंजूर विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण लवकरच करण्यात येईल.
ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी माझी व माझ्या सहकाऱ्यांची भूमिका कायम आहे. आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य व माझे सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम यांच्याशीही जरी संपर्क केल्यास मला याची संपूर्ण माहिती मिळते. आज, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त माळी समाज बांधवांनी मला आमंत्रित केले याबद्दल मी आपला आभारी आहे. सावित्रीबाईंच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, हीच अपेक्षा आहे. नववर्ष व जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद!”
माऊली मातेच्या चावळी बांधकामाचा शुभारंभ हा ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या सहभागाने खास सोहळा ठरला.यानिमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अधोरेखित करत त्यांचे प्रेरणादायी कार्य नव्या पिढीला दिशा दाखवणारे ठरले.
यावेळी प्रामुख्याने चावळी बांधकाम भूमिपूजनाला व सावित्रीबाई फुले या कार्यक्रमाला गडचिरोली चे जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,तालुकाध्यक्ष अर्जुनजी भोयर,माजी पं.स.उपसभापती रविंद्रजी बोल्लीवार,उपसरपंच परशुराम भोयर,भाजयुमो चे तालुकाध्यक्ष नितिनजी कारडे,ग्रा.प.सदस्य तथा मा.खा.अशोकजी नेते यांचे सहाय्यक व सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम, ग्रा.प.सदस्या सौ.वैशाली निकेसर,माळी समाजाचे अध्यक्ष संजयजी मोहुरले, युवा नेते विशाल करंडे,सामाजिक नेते रविंद्रजी निकेसर,मारोती गावतुरे,बंडूजी मांदाडे, नरेश निकोडे,निकरावे.शेंडे, अमोल निकेसर, बंडु निकेसर,सुभाष मांदाडे, बबन बोरूले,कैलास कोकोडे,मोरेशवर कावडे, परशुराम कावडे,अनिल भुरसे,चंद्रकला कडुकार,भावना निकेसर,निलिमा निकोडे,तसेच मोठया संख्येने माळी समाज बांधव व गावातील बंधु भगिनीं उपस्थिती होते
