महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
वर्ल्ड हिन्दू इकनॉमिक परिषदेचा शुभारंभ
पत्रकार आनंद मेश्राम
मुंबई, दि.१३: महाराष्ट्र राज्याला देशातील उपट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याच्या अर्ध्या ट्रिलियनचे उद्दिष्ट पार केलेले आहे. आता 2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर,बिकेसी,वांद्रे येथे १३ ते १५ डिसेंबर रोजी वर्ल्ड हिन्दू इकनॉमिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
यावेळी वर्ल्ड हिन्दू इकनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, माजी मंत्री तथा आमदार मंगल प्रभात लोढा, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष राजेश शर्मा, प्रमुख वक्ते पद्मश्री टी.व्ही.मोहनदास पै, सहसचिव शैलेश त्रिवेदी यासह जगातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र येणाऱ्या काळात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल. वर्ल्ड हिंदू इकॉनोमिक परिषदेने भारताच्या संस्कृतीवर आधारित विकासाच्या तत्वावर आधारित विकास करण्याच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या आहेत.पाश्चिमात्य संस्कृती आणि आपल्यात मूलभूत अंतर आहे. पाश्चिमात्य संस्कृती मध्ये जो कोणी सक्षम आहे तोच विकास करू शकतो असे आहे. तर हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक जन्मलेला व्यक्तीला आपला विकास करण्याचा हक्क आहे .
भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा विकास हा मुंगीच्या पावलांनी सुरू आहे असं म्हटलं जायचं.भारताचे अर्थव्यवस्था ही जगात न टिकणारी आहे असा लोकांचा समज होता. मात्र आजच्या भारताच्या नेत्रदीपक प्रगतीने सर्व जगाला थक्क करून टाकले आहे. सर्वाधिक गतीने पुढे येणारी भारत जगात तिसरी महासत्ता म्हणून पुढे येत आहे.जगातील लोक म्हणत होते की एवढे मोठी लोकसंख्या असलेला देश कशाप्रकारे प्रगती करू शकतो ? पण देशातील उपलब्ध मनुष्यबळ हेच विकासाचे महत्त्वाचे साधन असून प्रत्येकाला विकासामध्ये सोबत घेऊन जात आहोत असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आज मोठ्या गतीने पुढे चालला आहे. महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी एक सल्लागार कमिटीची स्थापना केली असून या समितीच्या सल्ल्याने महाराष्ट्र कोणकोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो याचा आम्ही अभ्यास केला. यावर आधारित महाराष्ट्र राज्याच्या विकासाची धोरण बनवले आहेत. विकासाची गती मध्ये जागतिक पातळीवरती महाराष्ट्र विकासाला पूरक एक साखळी बनवत आहे. महाराष्ट्राचे लॉजिस्टिक धोरण, सर्वाधिक गतिमान रस्त्यांचे जाळे बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग ७०० किलोमीटर असून जो 16 जिल्ह्यांना जोडला आहे हा महामार्ग थेट जेएनपीटी या बंदराला जोडला आहे यातून अत्यंत चांगल्या पुरवठा दारांची साखळी निर्माण होणार आहे, रस्ते, विमान वाहतूक,बंदर विकास या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावरती महाराष्ट्र राज्य शासन भर देत आहे. देशासोबतच महाराष्ट्राला मेरीटाईमची ताकद बनवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ध्यास आहे. जेएनपीटी पेक्षाही तिप्पट मोठे असलेले वाढवण बंदर होणार आहे जे जगातील सर्वात मोठे जहाज या बंदरावर उतरू शकते. २०१४ पासून प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर देशात पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला गती दिली आहे असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारावर आधारित विद्यमान देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला गती देणारी नवीन धोरण बनवलेले आहेत. विकासामुळे लोकांच्यामध्ये दुरावा वाढलाय असे म्हंटले जात असताना भारताने गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वरती आणलेले आहे.देशाचे हिंदू विकासाचे मॉडेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगासमोर आणले आहे.हिंदू चिंतनावर आधारित जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा जगाला एक दिशादर्शक देश म्हणून भारत ओळखला जात आहे. 2030 पर्यंत भारताला ५ ट्रिलियन इकॉनॉमिक बनवणार आहोत. हे उद्दिष्ट तर आम्ही 2028 पर्यंतच पूर्ण करू. वेगवेगळ्या आर्थिक संस्था असे सांगत आहेत की भारत देश सात ट्रिलियन इकॉनॉमिचे किंवा 9 ट्रिलियनचेही उद्दिष्ट गाठू शकतो . आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित विकासावर भर देत आहोत. विकास सर्वेक्षणानुसार २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य देशात वॉटर टेबल मध्ये देखील प्रथम होते. राज्यातील वनांचे आच्छादन देखील जास्त आहे. ग्रीन ऊर्जा, नदीजोड प्रकल्प यातून शाश्वत विकासावरती राज्य भर देत आहे असेही असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले
प्रमुख वक्ते पद्मश्री टी.व्ही.मोहनदास पै म्हणाले की, देशामध्ये उपलब्ध मनुष्यबळ हे आपल्या विकासाचे बलस्थान आहे.विकसित भारत हेच भारताचे भवितव्य आहे. भारतीय संस्कृती हा विचार आहे तो जगात पुढे नेणे गरजेचे आहे. युवांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणे, आरोग्य, शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, महिला सबलीकरण यावरती काम होणे गरजेचे आहे. भारता ला जगातील महसत्ता बनवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे विकासाचे अनेक पैलू यावेळी पद्मश्री टी.व्ही.मोहनदास पै यांनी मांडले.
*****