चामोर्शीत स्वर्गीय स्वप्नीलभाऊ वरघंटे स्मृती प्रित्यर्थ प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन_
*_मा. खा. अशोकजी नेते आणि आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या उपस्थितीत संपन्न_
(चामोर्शी, १३ डिसेंबर २०२४:)
चामोर्शी शहरातील महिला महाविद्यालयाच्या भव्य पटांगणात स्वर्गीय स्वप्नीलभाऊ वरघंटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते उपस्थित होते. त्यांनी फित कापून आणि चेंडू टोलवून या स्पर्धेचे उद्घाटन केले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना अशोकजी नेते म्हणाले, “स्वप्नील माझ्यासाठी लहान भावाप्रमाणे होता. तो सदैव कोणत्याही कामासाठी तत्पर असायचा. त्याची कार्यक्षमता आणि समर्पण हनुमानासारखी होती. आजही त्याची आठवण माझ्या हृदयात जिवंत आहे. त्याच्या स्मृतीला साजेसा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे. स्पर्धेच्या आयोजक आणि खेळाडूंना मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे, तसेच या स्पर्धेच्या आयोजिका नगरसेविका रोशनीताई वरघंटे यांच्यासह भाजपाचे युवा नेते तथा ओबीसी नेते भास्कर बुरे,युवा नेते नरेश अल्सावार, निरज रामानुजवार, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उमेश अग्रवाल, वासुदेव चिचघरे, रेवनाथ कुसराम,भाविक आभारे, गजानन बारसागडे, चांदेकर सर,शेषराव कोहळे, संतोष भांडेकर,पोषक गेडाम, मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात झाले असून, शहरातील बंधू-भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वप्नीलभाऊंच्या स्मृतींना उजाळा दिला आणि या क्रिकेट स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
स्पर्धेचे आयोजक आणि सहभागी खेळाडूंच्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांनी संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.