नशा मुक्त भारत साठी मूकबधिरांचा संकल्प
नागपूर – संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी शंकर नगर येथील मूक आणि बधिर औद्योगिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य माया सांगोळे, विशेष शिक्षिका प्रणोती सत्यावनकर यांचे हस्ते फुग्यांसोबत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याची व्यसनमुक्तीपर पत्रके अवकाशात सोडण्यात आली. नंतर नशा मुक्त भारत अभियानाचे मास्टर स्वयंसेवक गौरव आळणे यांनी विद्यार्थ्यांना सामूहिक व्यसनमुक्तीची शपथ दिली.
कार्यक्रमाला भीमराव सालवणकर, निदेशक पंकज कोलते, विशेष शिक्षक सुखदेव पुंडकर, मोहित गेडाम, प्रिया राजोरिया, शालिनी भुयार, मधुवंती खोडे, मोनाली आगलावे, निलांबरी अपराजित, कपिल वासे, अरुणा आगाव, कविता पिल्ले, सरिता पटवर्धन, शैलेश बोरकर, सरला वाघमारे, देविदास हेलोंढे, अरुण माहुरले इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन मूकबधिर विशेष शिक्षिका द्रौपदी चव्हाण यांनी केले.
_________________________
प्रति
मा. कार्यकारी संपादक
दै. …………….., नागपूर
महोदयजी
कृपया प्रकाशणार्थ
आपला स्नेहांकित
गौरव आळणे
जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा संघटक
महाराष्ट्र अंनिस नशाबंदी मंडळ
नागपूर
मो.- 8600145219
Email – gauravalne609@gmail.com
