गडचिरोली जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा यांच्या नूतन निवासस्थानी वास्तूपूजन सोहळाला माजी खासदार अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्य
दिं. ११ डिसेंबर २०२४
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याचे संघचालक आणि प्रतिष्ठित ज्येष्ठ नेते माननीय श्री. घिसुलालजी काबरा यांच्या नूतन घराचे वास्तूपूजन विधी अत्यंत उत्साहपूर्ण व होम अग्नी या शुभप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांनी विशेष उपस्थिती दर्शवून काबरा परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
वास्तूपूजन विधीच्या निमित्ताने आयोजित होम अग्नीमध्ये धार्मिक विधींना अधिक महत्त्व देण्यात आले होते. या सोहळ्याला मा.खा.नेते यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. सामाजिक नेते श्री. नंदुजी काबरा यांच्यासह काबरा कुटुंबातील सदस्य आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी मा.खा. नेते यांनी काबरा परिवाराच्या समाजकार्याचे आणि नवे घर हे यशाचे प्रतीक असल्याचे कौतुक केले.
