मा. खा.अशोकजी नेते यांची धनोजे कुणबी समाज शिष्टमंडळाने घेतली भेट: समाजासाठी योगदानाचा गौरव
गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात आज, २६ डिसेंबर २०२४ रोजी धनोजे कुणबी समाजाच्या शिष्टमंडळाने माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांची भेट घेतली. समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शिष्टमंडळाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
*१५ लाख निधीची मंजुरी: विकासासाठी मजबूत पाऊल*
माजी खासदार अशोकजी नेते यांनी त्यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून धनोजे कुणबी समाजासाठी गडचिरोली येथील वृद्धाश्रम पाण्याच्या टाकीजवळ बहुउद्देशीय सभामंडपासाठी १२ लाख रुपये आणि संरक्षण भिंतीसाठी ३ लाख रुपये असे एकूण १५ लाख रुपयांचे भरीव योगदान दिले होते. या निधीमुळे समाजाच्या मूलभूत सुविधा उभारण्याचा मार्ग सुकर झाला.
*शिष्टमंडळाचे कृतज्ञ उद्गार*
धनोजे कुणबी समाजाच्या शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान अशोकजी नेते यांना म्हटले, “आपण दिलेला शब्द पाळून समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. आपल्यामुळे समाजासाठी उपयुक्त असे सभामंडप आणि संरक्षण भिंत उभारली जात आहे, याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.”
*समाजाच्या विकासाचा आदर्श*
माजी खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकारामुळे उभारले जाणारे सभामंडप हे केवळ एक इमारत नसून, समाजातील एकता, प्रगती आणि सकारात्मकतेचा केंद्रबिंदू बनेल. या योगदानामुळे समाजाला नवी दिशा मिळेल आणि त्यांच्या प्रगतीचा वेग वाढेल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला.
चर्चेच्या मनोगतात अशोकजी नेते म्हणाले, “समाजाच्या विकासासाठी केलेले प्रत्येक काम हे माझे कर्तव्य आहे. सभामंडपाचा उपयोग चांगल्या कार्यांसाठी होऊन समाजाने सकारात्मक बोध घ्यावा, ही माझी अपेक्षा आहे. संरक्षण भिंतीसह सभामंडपाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण होईल, असा मला विश्वास आहे. मी नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी पाठीशी राहील.”
याप्रसंगी शिष्टमंडळात धनोजे कुणबी समाजाचे प्रमुख नेते रामकृष्ण ताजने सर, भाजपा महिला मोर्चाच्या चिटणीस तथा समाजाच्या नेत्या रेखाताई डोळस, बोधाने सर, मधुकर विधाते, गोसाई पिंपळकर, अविनाश वांढरे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.